डी-मार्टसमोरील सर्विस रोडवर अवजड वाहनांचे बेकायदेशीर पार्किंग, वाहतूक कोंडीचा फटका


रत्नागिरी शहरातील वाहतुकीचा महत्त्वाचा मार्ग असलेल्या मिर्‍या-नागपूर महामार्गावरील टीआरपी परिसरात अवजड वाहनांच्या बेकायदेशीर पार्किंगमुळे वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका वाढला आहे. डी-मार्टसमोरील सर्विस रोडवर परराज्यातून येणारे दहा चाकी ट्रक दिवसनेंदिवस उभे राहात असल्याने नागरिक, वाहनचालक आणि व्यापारी त्रस्त झाले आहेत.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेशसह विविध राज्यांतील मालवाहू ट्रक सर्विस रोडवरच दीर्घकाळ उभे राहात असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे लहान वाहनचालकांना मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागत असून, अपघाताचा धोका वाढला आहे. मंगळवारी या समस्येवर कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलीस घटनास्थळी पोहोचले असता काही ट्रकचालकांनी पोलिसांशीच हुज्जत घातल्याची घटना घडली. पोलिसांनी वाहने बाजूला घेण्याच्या सूचना दिल्यानंतरही काही चालकांनी गाड्या हटविण्यास नकार दिल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. परिणामी वाहतूक कोंडीत आणखी भर पडली आहेwww.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button