
ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांची ’लाचलुचपत ’कडून चौकशी
ठाकरे शिवसेनेचे कुडाळ मालवण मतदारसंघातील माजी आमदार वैभव नाईक यांच्या मालमत्तेची येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) यांच्याकडून पुन्हा एकदा चौकशी करण्यात आली. एसीबीने पुन्हा एकदा नाईक यांच्या कणकवलीतील एका मालमत्तेबाबत सविस्तर माहिती मागवली आहे. या. पार्श्वभूमीवर माझी कितीही चौकशी करा, मी सर्व चौकशींना सामोरा जाईन; परंतु कुठल्याही राजकीय दबावाला बळी पडणार नाही, असा थेट इशारा नाईक यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून वर्ष २०२२ सालापासून माजी आमदार वैभव नाईक यांच्या मालमत्तेची चौकशी सुरू आहे. आता या चौकशीच्या फैर्यात एसीबीने वैभव नाईक यांनी खरेदी-विक्री व्यवहार केलेल्या कणकवली प्रभाग क्र. १ मधील इमारत क. ७ मधील गाळा आणि सीटी सर्व्हे क्र. ४३२१ ही मिळकते (गाळा) एकच आहेत की स्वतंत्र, याबाबतची अधिकृत माहिती मागवली आहे. या संदर्भात एसीबीने कणकवली नगरपंचायतच्या मुख्याधिकार्यांना रितसर पत्र पाठवून ही माहिती सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
www.konkantoday.com




