राज्यात विविध पुरस्कार प्राप्त रत्नागिरी जिल्ह्यातील प्रतीथयश *जैतापुरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यावर्षी आपला 27 वा गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा करीत आहे. दरवर्षी या मंडळाने राज्यशासन पुरस्कृत स्पर्धांसह विविध स्पर्धांमध्ये भाग घेत विविध स्तरावर बक्षिसे मिळविली आहेत. *राज्य शासन पुरस्कुत स्पर्धामध्ये मंडळाने यापूर्वी उत्कृष्ठ मूर्तिचे ही बक्शीस मिठगवाने येथील मूर्तिकार संतोष लिंगायत यांनी साकार केलेल्या मूर्तिने मिळविले होते त्यांचा सन्मान मुंबई*येथे तत्कालीन *सांस्कुतिक मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार*यांच्या शुभहस्ते झाला होता. आता पर्यंत *राजाच्या मूर्ति कणकवली येथील सुतार बंधु, मिठगावाने येथील संतोष लिंगायत,कुवेशी येथील भालचंद्र लिंगायत,जैतापुर येथील दिलीप भूते,दळे येथील संतोष गिरकर /प्रणव गिरकर आदिच्या हस्तकौशल्यातुन साकारल्या आहेत.आपणहि जैतापुर च्या या सुप्रसिद्ध मंडळाच्या सार्वजनिक गणेशोत्सवा मध्ये आपल्या हस्तकौशल्यातील गणेश मूर्ति ध्यावीं आणि आपली कला दाखवावी असा मनोदय *राजापुर वरचीपेठ येथील ताम्बट मूर्ति कला केंद्र या सुप्रसिद्ध गणेश चित्र शाळेचे मूर्तिकार प्रसाद आणि गुरुप्रसाद ताम्बट यांनी मंडळाचे पदाधिकारी गजानन करमळकर यांच्या समोर तीन वर्षापूर्वी व्यक्त केला होता मात्र गेली दोन वर्षी *सामाजिक कार्यकर्ते मेढ़ेकर गुरूजी आणि जैतापुर एजुकेशन सोसाइटी चे माजी कार्यवाह श्रीकृष्ण करगुटकर यांनी मूर्ति दिल्याने मंडळाने यावर्षी ताम्बट बंधु याना मूर्तिबाबत विचारणा केली असता त्यांनी *आनंदाने मंडळाला होकार दिला आहे. यबाबत आम्ही मंडळाकडून कोणताही मोबदला घेणार नसल्याचे सांगितले मूर्ति घड़वने आणि ग्राहकाना त्या मोबदला घेऊन देने हा मूर्तिकाराचा व्यावसाईक दृस्टीकोण असतो. मात्र *ताम्बट बंधु यांनी कोणताही मोबदला न घेता राजाची मूर्ति देण्याचे मान्य केल्याने राजापुर वरचीपेठ येथील ताम्बट मूर्ति कला केन्द्राचे प्रसाद ताम्बट आणि गुरुप्रसाद ताम्बट याना मंडळाने धन्यवाद दिले आहेत.