
जगबुडी पूल कायमस्वरुपी दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
सततच्या वर्दळीचा अन् रिक्षा व्यावसायिक, पादचार्यांसाठी सोयीचा असलेल्या भोस्ते जगबुडी पुलाच्या एका बाजूकडील मध्यभागाच्या लोखंडी सळ्या उखडल्या आहेत. यावर प्रशासनाने सिमेंटचा मुलामा देत मलमपट्टी केली आहे. हा पूल वाहतुकीसाठी असुरक्षित असतानाही कायमस्वरुपी डागडुजीसाठी प्रशासनाने अनास्था दाखवली आहे. दुरुस्तीचा प्रस्तावही लालफितीत अडकला असून बाहनचालकांना पुलावरून जीवघेणा प्रबास करावा लागत आहे.
जगबुडी शहरवासियांसह भोस्ते, अलसुरे, भोस्ते पुलाचा कोंडिवली, निळीक, वेरळ ग्रामस्थ वापर करतात. रेल्वे स्थानकात ये-जा करण्याकरिता याच मार्गाचा वापर होतो. ’शॉर्टकट’ प्रवासासाठी अवजड वाहतूकदारांची येथून वाहतूक सुरू असते. यामुळे पूल आणखी कमकुवत होवून थोका वाढला आहे.www.konkantoday.com




