चिपळूण शहरातील पाग कास्करआळी येथे सदनिकेतून दोन लाखाचे दागिने लांबवले


चिपळूण शहरातील पाग कास्करआळी येथील शाबिरा मंझिल या अपार्टमेंटमधील एका सदनिकेमधून २ लाख ८ हजार ९९७ रुपये किमतीचे दागिने लांबवल्याची घटना ५ ते १६ जून या कालावधीत घडली. याप्रकरणी सानिया फारुख झारे (१८, पाग
कास्कर आळी) हिच्यावर चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद नईमा रफिक झारे (५८, शबिरा मंझील, पाग कास्कर आळी) यांनी दिली
आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नईमा झारे याच्या राहत्या सदनिकेमधून सानिया झारेने बेडरूमचा बंद दरवाजा उघडून कपाटातील १ लाख २७ हजार ६०२ रुपये किंमतीचा नेकलेस, ४३ हजार ५५०७ व ३६ हजार २७९ रुपये किंमतीच्या दोन अंगठ्या, १ हजार ५२९ रुपये किंमतीच्या नाकातील पुली असा एकूण २ लाख ८ हजार ९१७ रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. या चोरी प्रकरणी सानिया झारे हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button