
चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाने खुर्द ग्रामपंचायतीमध्ये बनावट दाखला देवून सरकारला फसवले; शिपायावर गुन्हा
चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाने खुर्द ग्रामपंचायतीमध्ये शिपाई म्हणून कार्यरत असताना मानसिंग श्रीपत चव्हाण (मार्गताम्हाणे खुर्द) याने ६० हजाराचे उत्पन्न असल्याचा दाखला घेऊन त्याद्वारे घरकुलाचा लाभ घेत शासनाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शिपाई मानसिंग चव्हाण याच्यावर चिपळूण पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची फिर्याद मार्गताम्हानेचे ग्रामपंचायत अधिकारी मनोहर शंकर गायकवाड (५५) यांनी दिली आहे. मानसिंग चव्हाण हा मार्गताम्हाने खुर्द ग्रामपंचायतीचा शिपाई पदावर ३१ जानेवारी २०२६ पर्यंत कार्यरत असताना त्याचे मे २०२१-२०२२ मधील उत्पन्न १ लाख ४७ हजार १०९ रुपये इतके होते. असे असताना त्याने ६० हजार उत्पन्न असलेला दाखला घेऊन त्याद्वारे प्रधानमंत्री घरकुल आवास योजना ग्रामीण अंतर्गत घरकुलांचा लाभ घेऊन मे २०२२ ते १० फेब्रुवारी २०२६ या कालावधीत मार्गताम्हाने खुर्द येथे घरकुल बांधले. यातूनच शासनाची फसवणूक केली आहे.
www.konkantoday.com




