चिपळूण तालुक्यातील कामथे नदीपात्रात फेकला वैद्यकीय कचरा, नागरिकांकडून कारवाईची मागणी


चिपळूण तालुक्यातील कामथे येथील गणपती विसर्जन घाट परिसरातील नदीपात्रात अज्ञात व्यक्तींनी रुग्णालयातील धोकादायक वैद्यकीय कचरा टाकल्याचा धक्कादायक उघडकीस आला आहे. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली असून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी होत आहे.
कामथे गावातील नदी परिसर हा लोकवस्तीच्या अगदी जवळ असून ग्रामस्थ दैनंदिन वापरासाठी या ठिकाणी येत असतात. अनेक महिला येथे कपडे धुण्यासाठी येतात, तर शेतकरी आपल्या गुरांना पाणी पाजण्यासाठी याच नदीकाठाचा वापर करतात. अशा महत्त्वाच्या आणि वर्दळीच्या ठिकाणी वैद्यकीय कचरा टाकण्यात आल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. घटनास्थळी वापरलेल्या सलाईनच्या बाटल्या, इंजेक्शन, सुया तसेच विविध प्रकारचे वैद्यकीय साहित्य मोठ्या प्रमाणात आढळून आले.
हा कचरा संसर्गजन्य असण्याची शक्यता व्यक्त केली जात असून त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नदीपात्रात अशा प्रकारचा वैद्यकीय उ कचरा टाकणे हे पर्यावरणासाठी तसेच मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक मानले जाते स्थानिक नागरिकांनी हा प्रकार निदर्शनास आणून दिल्यानंतर कामथे सरपंच अक्षदा कासार, हरी कासार, तेजस कदम तसेच तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सुनील खेडेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button