
चिपळूण तालुक्यातील अलोरे- देवरेवाडी येथील अंगणवाडीचे सिलिंग अचानक कोसळले.
चिपळूण तालुक्यातील अलोरे- देवरेवाडी येथील अंगणवाडी इमारतीच्या वर्गखोलीतील सिलिंग अचानक कोसळल्याची धक्कादायक घटना घडली असून सुदैवाने यावेळी वर्गात शिकणारी सुमारे १५ मुले उपस्थित नसल्याने मोठी दुर्घटना टळली. या घटनेनंतर अंगणवाडी इमारतीच्या बांधकामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून ग्रामस्थांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
या संदर्भात वसंत चिपळूणकर आणि सिकंदर चिपळूणकर यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच गटविकास अधिकार्यांना निवेदन सादर केले आहे. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, अवघ्या एका वर्षापूर्वी दुरुस्ती अथवा बांधकामासाठी खर्च करण्यात आला असतानाही अंगणवाडीचे सिलिंग कोसळल्याने कामाच्या गुणवत्तेबाबत शंका उपस्थित होत आहे.www.konkantoday.com




