
चिपळूण आगारातील चालक-वाहक विश्रांतीगृहाची अनेक वर्षानंतर छप्पर दुरूस्ती
आगारातील चालक, वाहक विश्रांतीगृहांची कित्येक वर्षानंतर छप्पर दुरुस्ती केली जात आहे. वास्तविक विश्रांतीगृहाची इमारतच जीर्ण असून ती नव्याने बांधून विविध सुविधाचा समावेश करणे गरजचे होते. असे असतानाच केवळ छप्पर दुरुस्ती करुन तात्पुरत्या स्वरुपाची डागडुजी केली जात आहे.
मध्यवर्ती बसस्थानक इमारती बांधणीनंतर चालक-वाहकाच्या आरामासाठी विश्रांतीगृहाची इमारत बांधण्यात आली. कित्येक वर्षापासून कार्यरत असलेले हे विश्रांतीगृह परजिल्ह्यातून येणार्या चालक-वाहकांच्या आरामासाठी महत्त्वाची सुविधा मानली जाते. या विश्रांतीगृहाचे छप्पर जीर्ण झाले असून अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ते बदलले जात आहे.www.konkantoday.com




