
गुहागर-विजापूर महामार्गावर पिंपळी-खुर्द येथे काचेच्या बाटल्यांचे भंगार शेवटी हटवले
गुहागर-विजापूर महामार्गावर पिंपळी-खुर्द येथे रस्त्याच्या अगदी कडेला ठेवलेले काचेच्या बाटल्यांचे भंगार अखेर हटवण्यात आले आहे. हिंदू राष्ट्र समन्वय समितीने केलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई झाली आहे.
गेल्या काही वर्षापासून पिंपळी खुर्द महामार्गालगत मोठ्या प्रमाणात काचेच्या बाटल्यांचे साहित्य रचून ठेवण्यात आले होते. याच्या अनेकांनी तक्रारी केल्या. मात्र तरीही अधिकारी व संबधित मालक याकडे दुर्लक्ष करीत होते. हा प्रकार हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्या कार्यकर्त्यांना दिसून आला. त्यामुळे त्यांनी हे साहित्य या मार्गावरून होणार्या मोठ्या प्रमाणातील वाहतुकीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकते हे राष्ट्रीय महामार्ग उपविभागीय कार्यालय व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले यांना तक्रार अर्ज देऊन लक्षात आणून दिले.
www.konkantoday.com




