
गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेचे १३ जुलैपासून आरक्षण सुरू
यंदाच्या गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्या चाकरमान्यांनी आतापासूनच रेल्वे आरक्षणाची तयारी सुरू करावी लागणार आहे. गणेश चतुर्थीच्या काळात कोकण रेल्वे मार्गावरील नियमित गाड्यांमध्ये प्रवास करण्याची इच्छा असलेल्या प्रवाशांसाठी दि. १३ जुलैपासून आरक्षण प्रक्रिया सुरू होणार असून, वेळेत आरक्षण न मिळाल्यास विशेष गाड्यांवर अवलंबून राहाण्याची वेळ येऊ शकते.
गणेशोत्सव हा कोकणातील सर्वात मोठा आणि भावनिक सण मानला जातो. या काळात मुंबई, ठाणे, पुणे आणि इतर शहरांत नोकरी-व्यवसायासाठी स्थायिक झालेले लाखो कोकणवासी आपल्या गावी परततात. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील नियमित गाड्यांचे आरक्षण काही मिनिटांतच पूर्ण होत असल्याचे चित्र दरवर्षी दिसून येते.www.konkantoday.com




