खेड येथील गणेश विसर्जन घाटाचे काम रखडले


जगबुडी पुलालगतच्या दुसर्‍या बाजुला नव्या गणेश विसर्जन घाटाचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र सद्यस्थितीत काम रखडलेलेच आहे. गणेश विसर्जन घाट उभारणीच्या कामासाठी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या प्रयत्नाने कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मात्र अडीच वर्षाचा कालावधी लोटूनही अद्याप काम पूर्ण झालेले नाही. यामुळे यंदाही गणेशभक्तांची परवड होणार आहे.
जगबुडी नदीपात्रात गणरायाचे विसर्जन केले जाते. या विसर्जन प्रक्रियेदरम्यान जुन्या गणेश विसर्जन घाटावरील जागा अपुरी पडत होती. पर्यायाने गणेशभक्तांना रस्त्यालगतच. उभे राहावे लागत होते जगबुडी पुलानजीक नव्या गणेश विसर्जन घाटाच्या निर्मितीसाठी योगेश कदम यांना साकडे घालण्यात आले होते मंत्री कदम यांनी ही बाब गांभीर्याने घेत नव्या गणेश विसर्जन घाटामाठी निधी उपलब्ध करून दिला. मात्र सुरुवातीपासूनच घाटाचे काम धिम्या गतिनेच सुरू होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button