
क्रेडाई रत्नागिरीकडून सुमित ओसवाल यांचा सन्मान
लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सुमित भैरूमल ओसवाल यांचा क्रेडाई रत्नागिरीकडून विशेष सत्कार करण्यात आला. क्रेडाई रत्नागिरीचे पदाधिकारी व सद्स्यांनी ओसवाल यांचे अभिनंदन करून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सामाजिक बांधिलकी, नेतृत्वगुण आणि समाजसेवेतील योगदान लक्षात घेऊन त्यांचा हा गौरव करण्यात आला. यावेळी अध्यक्ष महेश गुंदेचा, दीपक साळवी, नित्यानंद भूते, रुपेश साळवी, के. एस. पोवार, दिनेश जय, माफी पदाधिकारी उपस्थित होते. सत्काराबद्दल ओसवाल यांनी क्रेडाई रत्नागिरीच्या सर्व सदस्यांचे आभार मानले व लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीच्या माध्यमातून समाजहिताची विविध उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार व्यक्त केला.www.konkantoday.com




