कोयना धरणातील पाणी कमी झाल्याने चिपळूण शहराला होतोय मचूळ पाण्याचा पुरवठा


कोयना धरणाच्या तळ पाणीपातळीने गाठल्याने साहजिकच काही टप्यांमधील वीज निर्मिती थांबली आहे. त्यामुळे वीजनिर्मितीनंतरचा पाण्याचा विसर्गही थांबला असल्याने वाशिष्ठी नदी कोरडी पडली आहे. याचा परिणाम शहराच्या पाणी पुरवठ्यावर झाला आहे. खेर्डी-माळेवाडी येथील जॅकवेलजवळ पाणी असल्याने अर्ध्या शहराला चांगले पाणी मिळत आहे. मात्र दरवर्षीप्रमाणे गोवळकोट येथील जॅकवेलपर्यंत पाणी जात नसल्याने गोवळकोटसह गोवळकोटरोड, पेठमाप, मुरादपूर, उक्ताड, बाजारपेठ या भागांचा पाणीप्रश्न गंभीर बनला चिपळूण शहरातील पेठमाप परीटआळी येथे टँकरने पाणी देताना नगरपरिषद कर्मचारी आहे. जॅकवेलजवळ खाडीचे मचूळ पाणी येत असल्याने त्याची उचल करून ते नागरिकांना पुरवले जात आहे. त्यामुळे नागरिकांमधून ओरड सुरू झाली आहे यावर उपाय म्हणून सध्या दोन टँकरच्या माध्यमातून पाणी दिले जात आहे आणखी काही दिवस अशी परिस्थिती राहणार असून त्यानंतर पाणी पुरवठा सुरळीत होईल, असे न. प. पाणी पुरवठा विभागाकडून सांगितले जात आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button