
जिल्हा परिषद श्री शामराव पेजे सभागृहात १३ ऑगस्ट रोजी निवृत्तीवेतन धारकांचा मेळावा
रत्नागिरी, दि. 28 ) : निवृत्ती वेतन धारकांना देण्यात येणारे निवृत्ती वेतन व इतर लाभ देण्यासबंधी चर्चा करण्यासाठी दि. १३ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषदेच्या श्री शामराव पेजे सभागृहात सकाळी ११ ते १ या वेळेत निवृत्तीवेतन धारकांचा मेळावा घेण्याचे निश्चित केले आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व निवृत्तीवेतन धारक व त्यांचे संघटनांचे प्रतिनिधी तसेच बँक व्यवस्थापक / प्रतिनिधी यांनी या मेळाव्यास उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी यांनी केलेले आहे.




