
विषारी औषध प्राशन केलेल्या दापोली येथील तरुणाचा मृत्यू
राहात्या घरी गवत मारण्याचे विषारी औषध प्राशन केलेल्या ३० वर्षीय तरुणाचा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. मिलिंद सुरेश भुवड (वय ३०, रा. साखळोली गणेशवाडी, दापोली) असे मृत तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मिलिंद भुवड याने दि. ११ जुलै रोजी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास दापोली येथील आपल्या राहात्या घरी अज्ञात कारणातून गवत मारण्याचे विषारी औषध प्राशन केले होते. त्यांची प्रकृती बिघडल्याने नातेवाईकांनी त्यांना तातडीने दापोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले होते. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारांसाठी दि. १२ जुलै रोजी सकाळी ६ वाजता त्यांना रुग्णवाहिकेद्वारे रत्नागिरी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले होते. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू असताना, १३ जुलै रोजी सुमारास त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.




