
चिपळूण शहरात स्वच्छतागृहांसाठी मोजावे लागणार पैसे
चिपळूण नगरपरिषदेने लाखो रुपये खर्च करून शहरात उभारलेली शौचालये चालवण्यास दिली जाणार आहेत, या शौचालयांच्या वापरासाठी महिलांना ३. पुरुषांना ५ तर आंघोळीसाठी सर्वांना १० रुपये मोजावे लागणार आहेत. तसा ठराव नगरपरिषदेच्या नुकत्याच झालेल्या सभेत घेण्यात आला. तसेच पाणी टंचाई काळात वापर व्हावा म्हणून ज्या व्यावसायिक, नागरिकांनी सार्वजनिक विहिरींवर कब्जा केला आहे त्या सर्व ताब्यात घेण्याची मागणी नगरसेवकांनी प्रशासनाकडे केली आहे. शहरातील दुर्धर आजारग्रस्त ६५ महिलांना प्रत्येकी १० हजार रुपये दिले जाणार असून भटक्या कुत्र्यांच्या गळ्यात लवकरच काठी येणार आहे.
नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्या अध्यक्षखाली झालेल्या सभेत शहरातील बहादूरशेखनाका, मध्यवर्ती बसस्थानक परिसर, शिवनदी आदी परिसरात असलेली नगरपरिषदेची शौचालये चालवण्यास देण्याचा विषय चर्चेला आला असता वरील निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे लवकरच याची निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे शहरात यावर्षी भासलेली पाणी टंचाई भविष्यातील धोक्याची घंटा आहे त्यामुळे पाणी टंचाईवर आताच पाय शोधले पाहिजेत. त्यामुळे कामेय बदील धरणातील गाळ उपसा करून पूर्वीची पाईपलाईन शोधून तेथून बाणी आणता बईल का याचा विचार प्रशासनाने करावा असा मुद्दा नगरसेवक मिथिलेश नरळकर यांनी उपस्थित केला शहरातील विहिरी, बोअरवेल याची साफसफाई करण्यात यावी. ज्या मोक्याच्या व कायम भरपूर पाणी असलेल्या सार्वजनिक विहिरीवर काही व्यावसायिक, नागरिकानी कब्जा केला आहे. त्यांचा शोध घेऊन त्या आपल्या ताब्यात घ्याव्यात अशी मागणीही काही नकार्न प्रशासनाकडे केली आहे.




