
आज राज्यातील अनेक भागात भारतीय हवामान विभागा कडून पावसाचा अलर्ट
यंदा राज्यात उशीरा पाऊस दाखल झाला असला तरीही दमदार पाऊस हजेरी लावताना दिसत आहे. आज राज्यातील अनेक भागात भारतीय हवामान विभागाने पावसाचा अलर्ट जारी केला. 1 जुलैपर्यंत राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला. ऑरेंज अलर्ट पावसाचा जारी करण्यात आला. राज्यातील जवळपास भागात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, रायगड, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सांगली, जळगाव, नंदुरबार, धुळे, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, जालना, अमरावती, अकोला, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली.
उद्या पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल. जळगावातील अंजनविहिरे गावातील झीरी नदीला पहिल्याच पावसात पूर आला असून नदीवरील बंधारा ओव्हरप्लो झाला आहे. अंजन विहिरेसह परिसरात जोरदार पाऊस झाल्याने मोठ्या छोट्या नाल्यांना पूर आल्याने झीरी नदीला पूर आला असून बंधारा ओव्हरप्लो झाला आहे.
नदीला पूर आल्याने परिसरातील शेतामधील कोरड्यात झालेल्या बोरवेल तसेच विहिरींना देखील पाणी आल्याचे जलस्त्रोत जिवंत झाल्याचे शेतकऱ्याने सांगितले. गोंदिया जिल्ह्यातील ग्रामीण भागात अखेर जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. अनेक दिवसांपासून दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांनाष यामुळे मोठा दिलासा मिळाला असून खरीप हंगामातील पेरणीच्या कामांना आता वेग येण्याची शक्यता आहे.




