
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये मोठी घसरण मात्र देशात पेट्रोल व डिझेल दरात कपात नाही
देशातील सरकारी तेल कंपन्यांनी नेहमीप्रमाणे आज 25 जून रोजी सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले असून आजही सर्वसामान्य ग्राहकांच्या पदरी निराशाच पडली आहे.नवीन दरानुसार देशभरात कुठेच दरकपात झाली नाही.
अमेरिका- इराण शांतता करारानाते आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये मोठी घसरण दिसून आली. सध्या ब्रेंट क्रूडचा भाव 76 डॉलर प्रति बॅरलपर्यंत आला असला तरी त्याचा थेट परिणाम अद्याप देशांतर्गत पेट्रोल-डिझेलच्या दरांवर झालेला नाही



