अकरावी प्रवेशासाठी शिक्षणमंत्र्यांचा मोठा दिलासा! गुणपत्रक, LC साठी सक्ती नाही; ‘या’ कागदपत्रावर होणार ॲडमिशन!


दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना अद्याप मूळ गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला मिळालेला नाही. या कारणामुळे अकरावी प्रवेश प्रक्रियेत अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी प्रवेश निश्चित करताना ही कागदपत्रे तात्काळ सादर करण्याची सक्ती न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत सहभागी विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या निर्देशानुसार शालेय शिक्षण विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यामुळे कागदपत्रांच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेश प्रक्रियेत वेळेत सहभागी होणे शक्य होणार आहे.

वर्ष २०२६-२७च्या अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत पहिली नियमित फेरी सुरू असून २९ मे २०२६ रोजी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश निश्चित करताना मूळ गुणपत्रक आणि शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्याची अट तात्पुरती शिथिल करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला उपलब्ध होताच सादर करण्यात येईल, असे हमीपत्र घेऊन प्रवेश निश्चित करता येणार आहे.

आधार व्हेरिफाइड विद्यार्थ्यांच्या गुणपत्रक डिजिलॉकरमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. गुणपत्रक आणि शाळा सोडल्याचा दाखला निर्धारित कालावधीत सादर न केल्यास संबंधित विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द करण्यात येऊ शकतो, याची जाणीव विद्यार्थी व पालकांना करून देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

शिक्षणमंत्र्यांचा थेट आदेश! विद्यार्थ्यांची अडवणूक खपवून घेतली जाणार नाही

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या अकरावी प्रवेश प्रक्रियेअंतर्गत २९ मे २०२६ रोजी पहिली नियमित गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. मात्र, अनेक शाळांमधून अद्याप विद्यार्थ्यांना मूळ गुणपत्रक आणि शाळा सोडल्याचा दाखला देण्यात आलेला नाही. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विद्यार्थ्यांना दिलासा देणारे निर्देश जारी केले आहेत:

सक्ती तात्पुरती शिथिल: महाविद्यालयांमध्ये प्रवेश निश्चित करताना मूळ गुणपत्रक आणि एलसी सादर करण्याची अट तात्पुरती काढून घेण्यात आली आहे.

थेट प्रवेशाची मुभा: केवळ कागदपत्रे नाहीत म्हणून कोणतेही कनिष्ठ महाविद्यालय गुणवंत विद्यार्थ्याला प्रवेश नाकारू शकत नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button