हातखंबा-पाली भागात दुसऱ्या दिवशीही तुफान वारा;पावसाच्या शिडकाव्याने उकाड्यातून दिलासा*


रत्नागिरी तालुक्यातील हातखंबा-पाली परिसरात सलग दुसऱ्या दिवशीही वादळी वाऱ्याने जोरदार हजेरी लावली. शुक्रवारी निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणानंतर शनिवारी दुपारनंतर पुन्हा एकदा आकाशात काळ्या ढगांची गर्दी झाली आणि परिसरात तुफान वाऱ्याचा जोर वाढल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.

सुसाट वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे रस्त्यांवरील धूळ, कचरा आणि पालापाचोळा हवेत उडताना दिसत होता. काही ठिकाणी दृश्यमानताही कमी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. अचानक बदललेल्या वातावरणामुळे नागरिकांनी सुरक्षित स्थळी धाव घेतली. वादळी वातावरणानंतर सायंकाळच्या सुमारास पावसाच्या मोठ्या थेंबांनी हजेरी लावत सुमारे पंधरा ते वीस मिनिटे हलका ते मध्यम स्वरूपाचा शिडकावा केला. या पावसामुळे दिवसभर जाणवत असलेल्या उकाड्यातून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. अवघ्या काही मिनिटांच्या पावसाने वातावरणात लक्षणीय गारवा निर्माण झाला असून परिसरातील हवामान आल्हाददायक बनले दरम्यान, हवामानातील या अचानक बदलामुळे पुढील काही दिवसांतही पावसाळ्यापूर्वीच्या वादळी सरींची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button