साखळोली येथे इको गाडी आणि दुचाकीचा अपघात; दोघे गंभीर जखमी


दापोली तालुक्यातील साखळोली येथे आज (२० मे) दुपारी इको गाडीची आणि दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, साखळोली येथील वळणाच्या रस्त्यावर हा अपघात घडला. इको गाडी आणि समोरून येणारी दुचाकी एकमेकांना अत्यंत वेगाने धडकल्याने हा अपघात झाला. अपघाताचा आवाज होताच परिसरातील स्थानिक नागरिकांनी आणि पादचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली व जखमींच्या मदतीसाठी शर्थीचे प्रयत्न केले.

नागरिकांनी प्रसंगावधान राखून गंभीर जखमी झालेल्या दोन्ही दुचाकीस्वारांना तातडीने उपचारासाठी दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. सध्या या दोन्ही जखमींवर रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button