पावस येथे शेख महंमद पीर उरूसास २२ नोव्हेंबरपासून प्रारंभ

गावखडी : रत्नागिरी तालुक्यातील श्रीक्षेत्र पावस येथे हजरत शेख महंमद पीर उरूसास २२ नोव्हेंबरपासून प्रारंभ होणार आहे. हजरत महंमद पीर याच्या समाधीला २२५ वर्षांच्या परंपरेचा वारसा लाभला असून, हा उरूस दरवर्षी कार्तिक पौर्णिमाच्या दिवशी मोठ्या भक्तीभावाने साजरा केला जातो.
उरूसाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच २२ नोव्हेंबर रोजी रात्री १०.३० वाजता मिरवणूकीनंतर समाधीवर चंदन चढवून धार्मिक विधीचा शुभारंभ होणार आहे. २३ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजता समाधीवर सामुदायिक पद्धतीने महावस्त्र (गिलाफ) परिधान करण्याचा सोहळा होईल .
उरूसाची सांगता २४ नोव्हेंबर रोजी होईल. यावेळी भाविकांना दर्शनासोबत सायंकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत महाप्रसादाचे वाटप केले जाईल.
हजरत शेख महंमद पीर हे जागृत देवस्थान मानले जाते. नवस फेडण्यासाठी आणि आशिर्वाद घेण्यासाठी सर्वधर्मीय भाविक दरवर्षी पावस येथे मोठ्या श्रद्धेने उपस्थित राहतात. भाविकांच्या सोयीसाठी चहा, थंड पेय, खाद्यपदार्थ आणि प्रसाद साहित्याची दुकानाने सज्ज होत असून, तीन दिवस परिसरात उत्सवी वातावरण अनुभवता येते.
या धार्मिक सोहळ्याचे व्यवस्थापन शेख महंमद पीर दर्गा ट्रस्ट पावस, मुस्लीमीन दख्खनी मोहल्ला व दर्गाचे मुजावर दाऊद, महमूद मुजावर पाहत आहे.
सर्व भाविकांनी उरूसास मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button