
सध्याचे दशक आपत्तींचे! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कडून चिंता; जग गरिबीच्या खाईत जाण्याचा इशारा!
”सध्या जग अनेक आव्हानांचा सामना करत आहे. आधी करोना, मग युद्धे आणि आता ऊर्जासंकट आल्याने हे दशक जगासाठी आपत्तींचे दशक बनले आहे. परिस्थितीत जर लवकर सुधारणा झाली नाही, तर गेल्या अनेक दशकांतील यश वाया जाईल आणि जगातील लोकसंख्येचा एक मोठा भाग गरिबीच्या खाईत लोटला जाईल,” अशी चिंता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी व्यक्त केली.
नेदरलँडमधील हेग येथे भारतीय समुदायाला संबोधित करताना पंतप्रधानांनी जागतिक संकटावर भाष्य केले. सध्याच्या काळाला ‘आपत्तींचे दशक’ असे त्यांनी संबोधले. जगभरातील अर्थव्यवस्थेला बाधा आणणार्या अनेक जागतिक संकटांकडे त्यांनी लक्ष वेधले. वाढत्या जागतिक व्यत्ययांना तोंड देण्यासाठी भारत आणि नेदरलँड विश्वासार्ह, पारदर्शक आणि भविष्यासाठी सज्ज पुरवठा साखळ्या तयार करण्याकरिता
सध्याचे दशक आपत्तींचे!
एकत्र काम करत आहेत, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. दोन्ही देश आंतरराष्ट्रीय प्रकल्पांवर अधिक जवळून समन्वय साधू शकतात आणि व्यापार, तंत्रज्ञान, संरक्षण व अपारंपरिक ऊर्जा यांसारख्या क्षेत्रांमध्ये सहकार्य अधिक दृढ करू शकतात, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी नेदरलँडचे राजे विलेम- अलेक्झांडर आणि राणी मॅक्सिमा यांची भेट घेतली आणि विविध मुद्द्यांवर चर्चा केली.




