रत्नागिरी जिल्ह्यातील जमीन मोजणीच्या प्रक्रियेला आता मोठी गती मिळणार


रत्नागिरी जिल्ह्यातील जमीन मोजणीच्या प्रक्रियेला आता मोठी गती मिळणार असून, भूमी अभिलेख विभागाच्या ताफ्यात तब्बल ७८ अत्याधुनिक रोअर मशिन्स दाखल झाली आहेत. या नव्या तंत्रज्ञानामुळे अवघ्या ३ ते १० सेकंदांत जमिनीचे अचूक रीडिंग मिळणार असून, अक्षांश-रेखांशासह जमिनीचा नकाशा (मॅप) तत्काळ स्क्रीनवर उपलब्ध होणार आहे. परिणामी मोजणीतील मानवी त्रुटींना आळा बसून, जमिनीच्या सीमावादांचे निराकरण अधिक वेगाने होण्यास मदत होणार आहे.
राज्य शासनाने जमीन मोजणीच्या शुल्कातही मोठी कपात केली असून, त्याचा सर्वसामान्य शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेषतः भाऊ हिस्सा वेगळा करण्यासाठी पूर्वी आकारले जाणारे २ हजार रुपयांचे शुल्क आता केवळ २०० रुपये करण्यात आले आहे. मात्र, या निर्णयामुळे भूमी अभिलेख विभागाच्या महसुलावर परिणाम झाला असून, जिल्ह्याचा वार्षिक महसूल सुमारे ६ कोटी रुपयांवर स्थिरावला आहे.
मोजणी प्रक्रिया अधिक सुलभकरण्यासाठी विभागाने पूर्वीचे विविध प्रकार बंद करून आता केवळ साधी मोजणी आणि जलद मोजणी असे दोनच प्रकार ठेवले आहेत. नव्या नियमानुसार १० हेक्टरपर्यंतच्या जमिनीच्या मोजणीसाठी ४ हजार रुपये शुल्क आकारले जाणार असून, त्यापुढील प्रत्येक हेक्टरसाठी नियमानुसार अतिरिक्त शुल्क आकारले जाईल. जिल्ह्यात मोजणीची कामे वेळेत पूर्ण उपलब्ध असून, सध्या मनुष्यबळाची कोणतीही करण्यासाठी पुरेशा संख्येने सव्र्व्हेअर (भूमापक) कमतरता नसल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे. तरीही जिल्ह्यात सुमारे ३५० जमीन मोजणीची प्रकरणे अद्याप प्रलंबित आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button