
रत्नागिरी- कोल्हापुर महामार्गावरील आंबा घाटातून चिर्यांची अवैध वाहतूक सुरू
रत्नागिरी- कोल्हापुर महामार्गावरील आंबा घाटात दरडी कोसळण्याच्या घटना सुरूच असताना दुसरीकडे चिर्यांची मोठ्या प्रमाणावर अवैध वाहतुक सुरू आहे. डंपरच्या हौद्यावर वर पर्यंत चीरा भरून वाहने कोल्हापुरच्या दिशेने धावत आहेत. चिरा पडून दुर्घटना होण्याची शक्यता आहे. चिरा वाहतुक करणार्या वाहनांना मागील बाजूस नंबर प्लेट देखील नसल्याचे चित्र आहे. महामार्ग एका बाजुला व मुर्शि चेकपोस्ट एका बाजुला यामुळे वाहनांची तपासणी होत नसल्याने वाहन चांगलेच फावले आहे. मात्र याला वरदहस्त कोणाचा? या प्रकारांकडे गांभीर्यान लक्ष देण्याची गरज आहे.




