संगमेश्वर पोलिसांची मोठी कारवाई , प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू पदार्थांचा साठा जप्त


संगमेश्वर पोलिसांनी मोठी कारवाई करत प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू पदार्थांचा साठा जप्त केला असून या प्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पारेख पेट्रोलपंपासमोर रस्त्याच्या साईडपट्टीवर करण्यात आली. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमएच-१४/बीके/४१२० क्रमांकाची सुझुकी कंपनीची वॅगनआर कार संशयास्पद अवस्थेत उभी असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. वाहनात मोठ्या प्रमाणावर शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व सुगंधित तंबाखू पदार्थ आढळून आले. दरम्यान, गाडीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानंतर संशयित चालकाने वाहन लॉक करून घटनास्थळावरून पलायन केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

या कारवाईत विमल पान मसाला, विविध प्रकारची सुगंधित तंबाखू तसेच प्रिमियम आरएमडी पान मसाला असा एकूण सुमारे रु. ५ लाख ४६ हजार ६०० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच संबंधित वॅगनआर कारही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button