
गाडीवरील चालकाने गाडी चोरून नेल्याची रत्नागिरी शहर पोलिसात तक्रार
रत्नागिरी शहरातील आठवडा बाजार येथे गाडीवर ठेवलेल्या चालकाने गाडी चोरुन नेली. अशी तक्रार रत्नागिरी शहर पोलिसात दाखल करण्यात आली आहे. ही घटना रविवारी सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान घडली. निसार अब्दुल सत्तार (रा. कोकणनगर रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. आदित्य संदेश निकम (रा. पेठकिल्ला रत्नागिरी) यांनी याप्रकरणी शहर पोलिसांत तक्रार दाखल केली. निसार हा आदित्य निकम यांची कार (एमएच ०८ एएल १९५५) वर चालक म्हणून कामाला होता. १२ एप्रिल रोजी निसार याने ही कार चोरुन नेली अशी तक्रार शहर पोलिसांत दाखल करण्यात आली आहे.
www.konkantoday.com




