
संगमेश्वर तालुक्यातील पातीचीवाडी येथे बी एस एन एल मनोऱ्याजवळ अंगणवाडीची इमारत
संगमेश्वर तालुक्यातील पातीचीवाडी येथे कंपनीच्या मुरादपुर बीएसएनएल मनाेèयाजवळच 8 लाख 40 हजाराचा निधी खर्च करून – अंगणवाडीची इमारत उभारण्यात आली आहे. धाेकादायक ठिकाणी अंगणवाडी इमारत असल्याने ती बंद पडली आहे. शासनाच्या निधीचा एकप्रकारे अपव्यय झाल्याचे चित्र दिसत आहे. अधिकारी, लाेकप्रतिनिधी यांच्या मनमानी कारभाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त हाेत आहे. या प्रकरणाची सखाेल चाैकशी करण्यात यावी, अशी मागणी हाेत आहे.
विकास कामांसाठी निधी उपलब्ध हाेत नसल्याचे चित्र आहे तर दुसरीकडे निधीचा अपव्यय हाेत असल्याचे विदारक चित्र आहे शाळा, अंगणवाडी इमारतीजवळ मनाेरा उभारायला परवानगी मिळालीच कशी? या देखील यक्ष प्रश्न आहे. पटसंख्येअभावी ही शाळा बंद पडल्याचे ग्रामस्थांमधून बाेलले जत आहे. अंगणवाडीची इमारत 8 लाखांची आहे का? हा देखील प्रश्न ग्रामस्थांना सतावत आहेत. अधिकारी व ठेकेदार यांच्या संगनमताने हा प्रकार घडला आहे. वरिष्ठ अधिकाèयाèयांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी हाेत आहे.www.konkantoday.com




