संगमेश्वर तालुक्यातील उमरे धरणावर अवलंबून दहा गावांत पाणीटंचाई


संगमेश्वर तालुक्यातील उमरे धरणातील पाणी साठा संपल्याने परिसरातील दहा गावातील महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागणार आहे. उमरे धरणाला. तीन वर्षापूर्वी गळती लागल्याने या धरणावर अवलंबून असलेल्या दहा गावाना मार्चपासून पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे मार्चपासून १ ते २ दिवसाड पाणी पुरवठा सुरु होता मात्र आज या धरणातील पूर्ण पाणी साठा संपल्याने आजपासून या परिसरातील दहा गावाना पाणी पाणी करण्याची वेळ आली आहे. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने अचानक संध्याकाळी ग्रामपंचायत कार्यालयाना उद्यापासून पाणी येणार नसल्याचे कळवल्याने आता अचानक पाण्याची काय व्यवस्था करायची हा प्रश्न प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयाला पडला आहे. पाणीपुरवठा विभागाच्या या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त होत आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button