वादळी वाऱ्याचा महावितरणाला फटका रत्नागिरी सह ग्रामीण भागात विद्युत पुरवठा खंडित


रत्नागिरी शहरात आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमाराला जोरदार झालेल्या वादळाचा फटका महावितरणाला बसला जोरदार सुटलेल्या वाऱ्यांमुळे शहरातील विद्युत पुरवठा जवळजवळ एक ते दीड तास खंडित झाला संध्याकाळी सहाच्या दरम्याने खंडित झालेला विद्युत पुरवठा सुरू करण्यास महावितरणाला यश मिळाले रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी पाऊस झाल्याचे वृत्त आहे

संगमेश्वर तालुक्यात झालेल्या प्रचंड वादळवाऱ्यामुळे विद्युत यंत्रणेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अनेक भागांतील वीज पुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे. संगमेश्वर उपकेंद्राला विद्युत पुरवठा करणाऱ्या ३३ केव्ही निवळी आणि ३३ केव्ही आरवली या दोन्ही मुख्य वाहिन्यांमध्ये बिघाड झाल्याने हा अंधार पसरला आहे. वादळाच्या तीव्रतेमुळे ठिकठिकाणी विद्युत खांब मोडून पडले असून वीजवाहिन्यांचे संचही तुटले आहेत, ज्यामुळे दुरुस्तीच्या कामात अडथळे निर्माण होत आहेत. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने शोधमोहीम राबवून आरवली वाहिनीचा तांत्रिक बिघाड शोधला असून, त्या ठिकाणी युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button