
वऱ्हाडाच्या ट्रकचा भीषण अपघात, 13 ठार, 25 जखमी; पालघरसह महाराष्ट्रावर शोककळा
पालघरमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर सोमवारी भीषण अपघात झाला. लग्नाचा निघालेल्या वऱ्हाडी मंडळींच्या आयशर ट्रकची कंटेनरला जोरदार धडक बसल्याने 13 जणांचा मृत्यू झाला असून 25 हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत.या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून लग्नाचा आनंद क्षणात दुःखात बदलला आहे. सध्या जखमींवर उपचार सुरू असून, अनेकांटची प्रकृती चिंताजणक आहे, त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, हा अपघात पालघर जिल्यातील धानीवरी गावाजवळ झाला. सुमारे 100 जण लग्न समारंभासाठी आयशर ट्रकमधून प्रवास करत होते. त्याचवेळी मुंबई-अहमदाबाद महामार्गावर ट्रकची समोरील कंटेनरला जोरदार धडक बसली. धडक इतकी भीषण होती की ट्रकचा ताबा सुटून तो रस्त्यावर पलटी झाला. अपघातानंतर घटनास्थळी एकच आरडाओरडा सुरू झाला.
जखमींवर उपचार सुरू
या भीषण अपघातानंतर अनेक जण वाहनाखाली आणि ट्रकमध्ये अडकले होते. परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. स्थानिकांनी पोलिस आणि रुग्णवाहिकांना माहिती दिल्यानंतर प्रशासनाची पथके घटनास्थळी पोहोचली आणि जखमींना बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले



