लांजा-राजापूर मतदारसंघात शिवसेनेला बळ: मुस्लिम समाजातील नेत्यांचा आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास


लांजा-राजापूर मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आला असून मुस्लिम समाजातील प्रमुख नेत्यांनी आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यामुळे मतदारसंघात शिवसेनेची ताकद आणखी वाढल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
उबठाचे मुस्लिम समाजाचे नेते श्री. परवेश घारे, मुस्लिम वेल्फेअर सोसायटी लांजाचे कार्याध्यक्ष श्री. अकिल नाईक, सर्फराज पन्हाळकर, समीर घारे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला. या प्रवेश सोहळ्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.

या प्रसंगी बोलताना नव्याने प्रवेश केलेल्या नेत्यांनी सांगितले की, *“आमदार किरण सामंत हे तळागाळातील जनतेच्या समस्या समजून घेऊन त्यावर तत्काळ तोडगा काढणारे नेतृत्व आहे. त्यांच्या विकासाभिमुख कामामुळे प्रभावित होऊन आम्ही शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.”

आमदार किरण सामंत यांनी सर्व नव्या कार्यकर्त्यांचे स्वागत करत सांगितले की, शिवसेना ही सर्वसामान्यांची आणि सर्व धर्मीयांना सोबत घेऊन चालणारी संघटना आहे. मुस्लिम समाजाने दाखवलेला विश्वास आम्ही विकासकामांच्या माध्यमातून सार्थ ठरवू.”*

या प्रवेशामुळे लांजा-राजापूर मतदारसंघात मुस्लिम समाजाचा मोठा पाठिंबा आमदार किरण सामंत यांना मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे. आगामी काळात या एकजुटीचा परिणाम स्थानिक राजकारणावर आणि विकासाच्या गतीवर निश्चितच दिसून येणार आहे.

प्रवेशकर्त्यांमध्ये परवेझ घारे
सुहेल मापारी,जावेद पठाण
शब्बीर शेरखान,अब्दुल शेरखान,सय्यद अली शेरखान
महमद अली शेरखान,हुसेन खान पठाण, हसन महालदार
सरफराज पन्हळेकर,अकिल रफिक नाईक,खालिद मुल्ला
असलम घारे,अन्वर पन्हळेकर
नजीम घारे,अतीक पन्हळेकर
समीर घारे, फिरोज घारे
नदीम गावरी,समीर पन्हळेकर
इरफान पन्हळेकर,नजीर पन्हळेकर, नबील पन्हळेकर
अरीफ नाईक,शब्बीर नाईक
सय्यद मोईन खान,मोसिन पन्हळेकर,साहिल पन्हळेकर फैजान पन्हळेकर ह्यांचा समावेश आहे.

ह्या सोहळ्यास अनेक स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button