राज्यातील भात शेतीत आमूलाग्र बदल घडण्याची चिन्हे, कृषी विद्यापीठाला ११२ कोटींचा ’महाअनुदानपूर्ण प्रकल्प’


दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठास राज्य आणि केंद्र शासनाच्या संयुक विद्यमातून तब्बल ११२ कोटी रुपयाचा ’महाअनुदानपूर्ण प्रकल्प. २० मंजूर झाला असून या प्रकल्पामुळे राज्यातील भात शेतीत आमूलाग्र बदल घडण्याची चिन्हे आहेत आतरराष्ट्रीय भात संशोधन संस्था फिलिपाईन्स यांच्यासोबतच्या सामंजस्य करारातून  महत्वाचा प्रकल्प साकारला जाणार आहे, यामुळे दापोली कृषी विद्यापीठाच्या कार्याचा जागतिक स्तरावर गौरव झाला आहे.
हा प्रकल्प पुढील ५ वर्षाच्या कालावधीत राबविण्यात येणार आहे यामध्ये ६० टक्के निधी केंद्र शासनाचा तर ४० टक्के निधी महाराष्ट्र शासनाचा असणार आहे. आहे. राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या १४ संशोधन केंद्रांमध्ये तसेच निवडक भात उत्पादक शेतकर्‍यांच्या शेतावर या प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यामुळे संशोधन आणि प्रत्यक्ष शेती यामधील दरी कमी होवून तंत्रज्ञानाचा थेट लाभ शेतकर्‍यांना मिळणार आहे. कुलगुरू डॉ. संजय भावे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकल्पाची संकल्पना विकसित करण्यात आली आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button