तोतया अन्न व औषध अधिकाऱ्यांपासून सावधान; संशय आल्यास त्वरित पोलिसांत तक्रार करा​सहाय्यक आयुक्त मिलिंद महांगडे यांचे व्यवसायिकांना आवाहन; अधिकृत अधिकाऱ्यांची नावे जाहीर


*​रत्नागिरी, दि.१६ : जिल्ह्यात कुठेही संशयित किंवा तोतया व्यक्ती अन्न आणि औषध प्रशासनाचे (FDA) अधिकारी असल्याचे भासवून व्यवसायाच्या ठिकाणी येत असल्यास किंवा पैशांची मागणी करत असल्यास, व्यवसायिकांनी त्वरित अन्न व औषध प्रशासन कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा पोलिसांत तक्रार दाखल करावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त मिलिंद महांगडे यांनी केले आहे.
​मागील काही दिवसांपासून अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्यावतीने काही ठिकाणी तपासणी किंवा धाडी टाकण्यात आलेल्या नसतानाही, ‘कार्यालयाचे अधिकारी आले होते’ अशा स्वरूपाच्या बोगस अफवा पसरवल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने व्यवसायिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
*​ओळखपत्राची मागणी करा*
​प्रत्येक व्यवसायिकाने आपल्या दुकानात किंवा आस्थापनेत तपासणीसाठी, चौकशीसाठी अथवा कोणत्याही कायदेशीर कार्यवाहीसाठी आलेल्या व्यक्तीकडे अन्न व औषध प्रशासन कार्यालयाच्या अधिकृत ओळखपत्राची (Identity Card) मागणी जरूर करावी आणि त्यांची ओळख पटवूनच खात्री करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
​रत्नागिरी जिल्ह्यातील अधिकृत अधिकारी:
​अन्न व औषध प्रशासन कार्यालयामार्फत जिल्ह्यात कायदेशीर रित्या कार्यरत असलेल्या अधिकृत अधिकाऱ्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत:
​सहाय्यक आयुक्त (अन्न): मिलिंद महांगडे (यांच्याकडे रायगड कार्यालयासोबतच रत्नागिरीचा अतिरिक्त कार्यभार आहे).
​औषध विभाग प्रमुख: शशिकांत यादव (संपूर्ण जिल्ह्याचा कार्यभार).
​अन्नसुरक्षा अधिकारी:
​तृप्ती घरत
​भाग्यश्री परदेशी
​संकेत कोणेरी
​ज्ञानेश्वर आटपाडकर
​ या अधिकृत अधिकाऱ्यांशिवाय अन्य कोणीही संशयास्पद व्यक्ती अधिकारी असल्याचे सांगून आल्यास किंवा आर्थिक मागणी केल्यास, त्याला बळी न पडता तात्काळ प्रशासनाशी किंवा जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button