रत्नागिरी तालुक्यातील काजिरघाटी येथे मधमाशा चावल्याने तरुण जखमी


रत्नागिरी तालुक्यातील काजिरघाटी येथील नर्सरीमध्ये काम करणार्‍या तरुणाला मधमाशा चावल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना सकाळी अकराच्या सुमारास घडली. महेश तेजू चव्हाण (२९, रा. काजिरघाटी-नर्सरी जवळ, रत्नागिरी) असे जखमी तरुण कामगाराचे नाव आहे. महेश चव्हाण हे नर्सरीमध्ये काम करत असताना अचानक मधमाशांनी हल्ला चढवला. उपचारासाठी महेश यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button