
रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील नाणीज येथील जुन्या मठाजवळ रिक्षा व ट्रॅक्टर अपघातात रिक्षाचालकाचा मृत्यू दोन महिला गंभीर
रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर सध्या रुंदीकरणाचे काम सुरू असून या रस्त्याच्या कामामुळे अनेक अपघात घडत आहेत नाणीज येथील जुन्या मठाजवळ सोमवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला, तर दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. सायंकाळी सुमारे ४.१५ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.प्रकाश शांताराम कांबळे (वय ४५, रा. दाभोळे बौद्धवाडी, ता. संगमेश्वर) असे मृत रिक्षाचालकाचे नाव आहे.
, दाभोळे परिसरातून रत्नागिरीकडे जाणारी रिक्षा (एमएच-०८ एक्यू ८८६६) महामार्गावरून जात असताना समोर असलेल्या ट्रॅक्टर चालकाने अचानक ब्रेक लावले. ट्रॅक्टरचे टायर फुटल्याने चालकाने वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र मागून भरधाव येणारी रिक्षा थेट ट्रॅक्टरवर आदळली.
धडक इतकी जोरदार होती की रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला. अपघातातील दोन महिला प्रवासी गंभीर जखमी झाल्या असून त्यांना मोफत रुग्णवाहिका सेवेमार्फत तातडीने पाली ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.




