
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘मन की बात’ कार्यक्रम रत्नागिरी शहरातील 37 बूथमध्ये उत्साहात संपन्न
रत्नागिरी : देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दरमहा होणारा ‘मन की बात’ हा कार्यक्रम देशवासीयांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. संपूर्ण देशभरात हा कार्यक्रम मोठ्या आवडीने आणि उत्साहाने पाहिला जातो.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान स्वतः देशभरातील अनेक चांगल्या गोष्टी, वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचे कौतुक करून त्यांची माहिती देशवासीयांपर्यंत पोहोचवतात. *रत्नागिरी शहरातील 67 पैकी 37 बूथमध्ये* रविवारी ‘मन की बात’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शहरभरातील नागरिक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने या कार्यक्रमाचा लाभ घेतला.
रत्नागिरी शहराध्यक्ष श्री. दादा ढेकणे यांच्या सूचनेनुसार व ‘मन की बात’ जिल्हा संयोजक नगरसेवक श्री. बाबू सुर्वे आणि शहर संयोजक श्री. विजय माळवदे यांच्या विशेष प्रयत्नाने हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.




