मुंबई-गोवा महामार्ग वरील कशेडी बोगदा ते चिपळूण पर्यंत महामार्गावर अवजड वाहनांमुळे अपघात, भाजपचे निवेदन


मुंबई-गोवा महामार्ग क्र.६६ वरील कशेडी बोगदा ते चिपळूण पर्यंत महामार्गावर अवजड वाहने उभी असतात. त्यामुळे सध्या या महामार्गावर वाहनांच्या अपघाताचे प्रमाण खूप वाढले असून, तसेच भरणे नाका येथील पुलाखाली अवैध पार्किंग केलेली आहे. त्यामुळे वातुकीसाठी अडचण निर्माण होत आहे. यासाठी तातडीने यावर कारवाई करावी अशा प्रकारच्या सूचना व निवेदन भारतीय जनता पार्टी कडून खेडचे पोलीस निरीक्षक श्री.विवेक आयरे यांना देण्यात आले

*याप्रसंगी भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे मा.नगराध्यक्ष ॲड.श्री.वैभवजी खेडेकर, भाजपा खेड शहराध्यक्ष श्री.भालचंद्र उर्फ नंदू साळवी, भाजपा अल्पसंख्यांक रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक गटनेते श्री.रहिम सहिबोल, भाजपा युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस अँड.मिलिंद उर्फ दादू नांदगांवकर, विजय गुप्ता, ओवैस चौगुले उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button