मंडणगड, दापोली व खेड तालुक्यातील माध्यमिक शाळांना सोलर पॅनलचे वाटप

खेड : आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या आमदार स्थानिक विकास निधीतून मंडणगड, दापोली आणि खेड तालुक्यातील माध्यमिक शाळांना सोलर पॅनलचे वाटप नुकतेच करण्यात आले.
कोकण विभागाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या आमदार स्थानिक विकास कार्यक्रम २०२५ – २६ अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील माध्यमिक शाळांना सोलर पॅनलचे वाटप कार्यक्रम कोकण विभागाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीमान चंदुलाल शेठ विद्यालय खेड येथे करण्यात आले. शाळांना मिळणारे वेतनेतर अनुदान हे अत्यंत तुटपुंजे आहे, अनेक शाळांना लाईट बिल भरण्यासाठी सुद्धा पैसे नसतात, दुर्गम डोंगराळ भागामध्ये लाईट सुद्धा खंडित होत असते, या सर्वांचा विचार करून पंतप्रधान नरेंद्र मोदी सौर ऊर्जेला प्राधान्य देण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचा हा प्रयत्न आहे, यातून शाळांना प्रेरणा आणि विद्यार्थी शालेय गुणवत्ता वाढवण्यासाठी सोलर सिस्टिमचा उपयोग होणार आहे. खेडमधील २०, मंडणगडमधील १०, व दापोलीमधील १५ शाळाना सुमारे एक कोटी दहा लाखाचे सोलर सिस्टिम साहित्य वाटप करण्यात आले. हे साहित्य फिटिंग करण्यासाठी पॅनल बॅटरी यूपीएस आणि वायरिंग फिटिंगसाठी लवकरच साहित्य घेऊन शाळेत येणार असल्याचे सांगण्यात आले. सोलर पॅनल सिस्टीम बसवल्यानंतर, त्याची निगा आणि देखरेखीविषयी सुद्धा माहिती देण्यात आली.
उर्वरित शाळांना दुसऱ्या टप्प्यात सोलर पॅनल देण्यात येतील, आजपर्यंत कोकण विभागात केलेल्या कामांची माहिती यावेळी देण्यात आली. तसेच अनुदान, पेन्शन, अर्धवेळ शिक्षक, विद्यार्थी निकष, शाळा तेथे मुख्याध्यापक, टीईटी, अशैक्षणिक कामे, वेतनेतर अनुदान व अन्य शैक्षणिक विषयांवर, करत असलेल्या पाठपुराव्याबद्दल आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी प्रमुख मान्यवर भाजपा नेते वैभव खेडेकर, संस्थेचे चेअरमन राजेश बुटाला, संचालक संजय बुटाला, मंडळ अध्यक्ष ऋषिकेश मोरे, दापोलीचे संचालक इक्बाल परकार, रत्नागिरी जिल्हा मुख्याध्यापक अध्यक्ष आयूब मुल्ला, नगरसेविका वैभवी खेडेकर, संभाजी देवकाते, लतेशमामा नांदगावकर, नंदू साळवी, जया साळवी, नगरसेवक रहीम सहीबोले, संदेश राऊत, पर्यवेक्षक उत्तम कांबळे यांच्यासह शाळांचे लाभार्थी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button