भाजप नेते हाजी अराफत शेख यांनी नितेश राणे यांच्यावर थेट आणि बोचरी टीका करत घरचा आहेर दिला


बकरी ईदची सगळीकडे तयारी सुरू आहे. अशा वेळी भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी आक्रमक भूमीका घेतली आहे. बकऱ्याची कुर्बानी देण्यावरून त्यांनी मुस्लिम समाजाला डिवचले आहे. शिवाय कारवाईचा इशारा ही दिला आहे.असा स्थितीत भाजपचेच एक नेते नितेश राणे यांच्या विरोधात मैदानात उतरले आहेत. त्यामुळे भाजपमध्येच अंतर्गत वाद उफाळून आल्याचे चित्र दिसत आहे. भाजप नेते हाजी अराफत शेख यांनी नितेश राणे यांच्यावर थेट आणि बोचरी टीका करत घरचा आहेर दिला आहे. “तुमच्या वडिलांनी मटणाच्या दुकानापासूनच सुरुवात केली होती,” अशी आठवण करून देत शेख यांनी राणेंना डिवचले आहे. शिवाय ईदनिमित्त मटण खाण्याचे थेट निमंत्रण ही दिले आहे.

हाजी अराफत शेख यांनी नितेश राणेंना सल्ला देताना त्यांच्या कौटुंबिक व्यवसायाचा उल्लेख केला. शेख म्हणाले, “नितेश राणे यांनी थोडी समजदारी दाखवण्याची गरज आहे. हा ईदचा सण आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांचे स्वतःचेही एक मटणाचे दुकान आहे. त्यांच्या वडिलांनी एका मटणाच्या दुकानापासून सुरुवात करून मंत्रीपदापर्यंत आणि केंद्र सरकारमध्ये मंत्री म्हणून झेप घेतली होती. चेंबूरमध्ये त्यांचे स्वतःचे एक हॉटेल आहे, ज्याला त्यांनी आपल्या आईचे नाव दिले आहे. तिथे ते उत्तम दर्जाचे खेकडे, मासे आणि मटण मसाला विकतात.” त्यावेळी त्यांना कोणती अडचण येत नाही असं ते म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button