दापोली तालुक्यात भाड्याने घेतलेली कार परत न केल्याप्रकरणी एकाविरूद्ध गुन्हा दाखल.


दापोली तालुक्यातील निगडे येथे भाडेतत्त्वावर दिलेली कार मुदत संपल्यानंतरही परत न केल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय संजय रेवाळे यांनी त्यांच्या मालकीची इर्टिगा कार (एमएच १४ एफएक्स २७६८) ही नरेश भागोजी सणस (रा. मांडवे, ता. खेड) याला भाडेतत्त्वावर वापरण्यास दिली होती. संबंधिताने ८ एप्रिल ते २० एप्रिल या कालावधीत वाहन वापरून नियोजित मुदतीत परत करणे अपेक्षित होते. मात्र मुदत संपल्यानंतरही सणस याने वाहन परत न करता ते स्वतःकडेच ठेवले. २५ एप्रिल रोजी दुपारी १२.३९ वाजेपर्यंतही वाहन मूळ मालकाकडे सुपूर्द करण्यात आले नाही. अखेर विश्वास संपादन करून अप्रामाणिकपणे वाहनाचा वापर केल्या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक निर्मळ करत आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button