दापोलीतील सामाजिक कार्यकर्ते मकबूल दिनवारे यांची पनवेलमध्ये गाडी फोडून १.२० लाखांची रोकड लंपास


पनवेल परिसरात भरदिवसा गाडीची काच फोडून तब्बल १ लाख २० हजार रुपयांची रोकड चोरी केल्याची धक्कादायक घटना घडली. दापोलीतील सामाजिक कार्यकर्ते मकबूल दिनवारे यांच्या कारला अज्ञात चोरट्याने लक्ष्य करत ही चोरी केली. विशेष म्हणजे शाळा आणि बँक परिसरातच हा प्रकार घडल्याने सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
याप्रकरणी मकबूल दिनवारे (५२, रा. तळोजा फेज-१) यांनी खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ मे रोजी मकबूल दिनवारे हे पत्नी रुबीना दिनवारे आणि मुलांसह तळोजा एमआयडीसी परिसरातील ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल अँड एज्युकेशन सेंटर येथे गेले होते. मुलीच्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील काही कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी त्यांनी आपली होंडा सिटी कार शाळेसमोरील पार्किंगमध्ये उभी केली होती.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button