
जिल्हा परिषद प्रशासनाने ऐतिहासिक आणि कठोर निर्णय, नळपाणी योजना पूर्ण केल्याशिवाय अधिकाऱ्यांची बदली नाही, जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत ठराव मंजूर
ग्रामीण भागातील रखडलेल्या नळपाणी योजनांमुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन रत्नागिरी जिल्हा परिषद प्रशासनाने ऐतिहासिक आणि कठोर निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या नळपाणी योजनांची कामे १०० टक्के पूर्ण होईपर्यंत संबंधित अधिकारी, कार्यकारी अभियंते आणि ग्रामीण पाणीपुरवठा अभियंत्यांच्या बदल्या होऊ दिल्या जाणार नाहीत, असा ठराव जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत विभागातील एकमुखाने मंजूर करण्यात आला.
जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे आणि उपाध्यक्ष विलास चाळके यांच्या उपस्थितीत मंगळवारी झालेल्या बैठकीत जलजीवन मिशनसह विविध पाणी योजनांच्या रखडलेल्या कामांवर सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होऊनही अनेक गावांमध्ये नागरिकांना अद्याप नियमित पाणीपुरवठा मिळत नसल्याचा मुद्दा बैठकीत जोरदारपणे उपस्थित एकमुखाने मंजूर करण्यात आला. यावेळी प्रशासनाने केवळ अधिकार्यांच्या बदल्यांवर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला नाही, तर योजना पूर्ण झाल्याशिवाय संबंधित कंत्राटदारांची बिलेही अदा केली जाणार नाहीत, असा कठोर निर्णयही घेतला. या निर्णयामुळे अपूर्ण कामे आणि दिरंगाई करणार्या अधिकार्यांवर व कंत्राटदारांवर मोठा दबाव निर्माण होणार आहे.
www.konkantoday.com




