खेड तालुक्यातील घेरारसाळगड-ओझरवाडीला विकासाची प्रतीक्षा


खेड तालुक्यातील देवघर-वाक्षेपवाडी व हुंबरी-खालचीवाडी या दोन गावांच्या मध्यभागी ओझरखोंड्यात वसलेली घेरारसाळगड-ओझरवाडी ७७ वर्षानंतरही विकासाच्या प्रतीक्षेत आहे. मूलभूत सोयी-सुविधांचा अद्यापही थांगपत्ता नसल्याने ग्रामस्थांची परवड सुरू आहे. शासनदरबारी खेटे घालून देखील पदरी निराशा पडत असल्याने आम्हाला कुणी वाली आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जिल्ह्यात एकीकडे कॉंक्रिटच्या रस्त्यांचे जाळे विणले जात असताना अजूनही ग्रामीण भाग रस्त्यासारख्या मुलभूत सुविधांपासून वंचित आहे. घेरारसाळगड-ओझरवाडीतही ये-जा करण्यासाठी रस्त्याचा थांगपत्ता नाही. यामुळे नियमित रहदारीसाठी ग्रामस्थांची मोठी गैरसोय होते. विद्यार्थ्यांचे हाल होतात.
याचा सर्वाधिक फटका रुग्णांना बसतो. रस्त्याअभावी रुग्णास दवाखान्यात घेवून जाण्यासाठी डोलीचा वापर करावा लागत पावसाळ्यात तर ही आहे. स्थिती अधिक भयानक बनते. ओझरवाडीजवळून ओझर ओढा वाहत असून पावसाळ्यात ४ महिने नार्गा नागरिकांचा संपर तुटतो. यामुळे वाडीतील विद्यार्थी शाळा व महाविद्यालयात जावू शकत नाहीत. दरवर्षी लाकडाचा साकर घालून तात्पुरती उपाययोजना केली जाते. यावरून जीवघेणा प्रवास करावा लागतो.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button