
खेडजवळील जांबुर्डे मोरवंडे येथे जंगलमय भागात तरूणाचा मृतदेह आढळला
मुंबई-गोवा महामार्गावरील जांबुर्डे मोरवंडे प्राथमिक शाळेच्या मागील जंगलमय भागात सुधीर दत्तात्रय चव्हाण (३९ रा. चाफळ-सातारा) या तरुणाचा मृतदेह आढळला. या प्रकरणी येथील पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू नोंद करण्यात आली आहे. तो आपल्या ताब्यातील दुचाकीने (एमएच ५० झेड ५८९०) मुलांना आणण्यासाठी जातो, असे सांगून घराबाहेर पडला होता. १३ मे रोजी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास ताब्यातील दुचाकी आबाच्या ढाब्याजवळ उभी करून दारू प्यायलेल्या स्थितीत पायी चालत जंगलमय भागात गेला. याठिकाणी तो उताणी स्थितीत पडलेला आढळला. उपचारासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकार्यांनी मृत घोषित केले.www.konkantoday.com




