
सुट्टीसाठी बाहेर पडणार्या पर्यटकांना एसटीचा भाडेवाढीचा फटका बसणार
उन्हाळी सुट्टयांचा आनंद लुटण्यासाठी बाहेर पडणार्या प्रवाशांच्या खिशाला आता एस.टी. महामंडळाने कात्री लावली १० टक्के हंगामी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला असून, या दराची अमलबजावणी सुरू होत आहे. यामुळे ऐन सुट्ट्यांच्या हंगामात पर्यटनासाठी किंवा मामाच्या गावाला जाणार्या प्रवाशाना आता प्रवासासाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत.
विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपल्यानंतर मोठ्या प्रमाणावर नागरिक सहलीचे आयोजन करतात. उन्हाळ्याच्या दिवसात एस.टी. बसला होणारी गर्दी लक्षात घेऊन एसटी महामंडळाने उत्पन्न वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. तसेच आखातातील युद्धजन्य परिस्थितीमुळे डिझेल पुरवठ्यावर झालेला परिणाम आणि वाढते खर्च यामुळे ही दरवाढ अटळ असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. ही तात्पुरती भाडेवाढ १५ जून २०२६ पर्यंत लागू राहणार असून, त्यानंतर दर पुन्हा पूर्ववत होण्याची शक्यता आहे.
www.konkantoday.com




