सा.बा. कंत्राटदारांना दिलासा, दोन दिवसांत बिलांची थेट खात्यात भरपाई


सार्वजनिक बांधकाम विभागातील प्रलंबित बिलांच्या विळख्यात अडकलेल्या कंत्राटदारांसाठी राज्य सरकारने अखेर मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. काम पूर्ण करूनही महिनोनमहिने पैसे न मिळाल्याने आर्थिक अडचणीत सापडलेल्या कंत्राटदारांना आता ड्रेड रिसीव्हेबल इलेक्ट्रॉनिक डिस्काऊटिंग सिस्टम या योजनेमुळे त्वरित निधी उपलब्ध होणार आहे.
राज्य सरकारच्या १० मार्चच्या शासन निर्णयानुसार सुक्ष्म, लघू व मध्यम उयोजक कंत्राटदारांना मंजूर बिलांच्या बदल्यात अवघ्या दोन कामकाजाच्या दिवसात पैसे मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे वर्षानुवर्षे प्रलंबित राहणार्‍या देयकांवर प्रश्‍न मोठ्या प्रमाणात सुटणार आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button