श्री स्वामी समर्थांच्या पालखीचे कशेळीत आगमन

गावखडी : रत्नागिरी तालुक्यातील श्री क्षेत्र गावखडी येथील श्री स्वामी समर्थ मठातर्फे आयोजित अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ पालखी दर्शन सोहळा उत्साहाच्या आणि भक्तिपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

श्री स्वामी देवांचा पूर्ण कृपेने व गुरुमाऊली गुरुदेव दास दिगंबर महाराजांच्या आशीर्वादाने राजापूर तालुक्यातील कशेळी येथे श्री स्वामी समर्थांच्या पालखीचे आज (२३ एप्रिल) सकाळी ११.३० वाजता ढोल ताशांच्या गजरात आगमन झाले. त्यानंतर श्री स्वामी समर्थ नामाचा गजर करण्यात आला. दुपारी १ च्या सुमारास महाआरती, तर त्यानंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नंदकुमार फोडकर, विश्वास फोडकर, गुरुनाथ फोडकर यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button