‘राष्ट्रीय महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत २१ एप्रिल रोजी नवी मुंबई येथे महिला जनसुनावणी


ठाणे, दि. १७ (जिमाका) : ‘राष्ट्रीय महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत महिला तक्रारींचे त्वरित निवारण करण्यासाठी दि. २१ एप्रिल २०२६ रोजी नवी मुंबई येथे महिला जनसुनावणीचे आयोजन करण्यात आले आहे. या जनसुनावणीस राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा मा. श्रीमती विजया रहाटकर अध्यक्षस्थानी राहणार आहेत.
राष्ट्रीय महिला आयोगाच्या नियोजनानुसार दि. २० एप्रिल २०२६ रोजी मुंबई येथे पोलीस महासंचालक (DGP) व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करण्यात येणार आहे. तसेच दि. २१ एप्रिल २०२६ रोजी ‘राष्ट्रीय महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत महिला जनसुनावणी आयोजित करण्यात येणार असून, या जनसुनावणीमध्ये महिलांच्या प्रलंबित तक्रारी तसेच प्रत्यक्ष (Walk-in) तक्रारींची सुनावणी करण्यात येणार आहे.
ही जनसुनावणी नवी मुंबई येथील सिडको भवन, सी.बी.डी. बेलापूर, ९ वा मजला येथे आयोजित करण्यात येणार असून, सकाळी १०.०० वाजल्यापासून प्राथमिक सुनावणी आणि दुपारी १२.०० वाजता मुख्य सुनावणी करण्यात येणार आहे.
जिल्हास्तरावरील विविध अधिकारी, पोलीस अधिकारी, समाजकल्याण विभाग, महिला व बाल विकास विभाग तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण (DLSA) यांचे प्रतिनिधी या सुनावणीस उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा प्रशासनाने आवश्यक त्या सर्व तयारीचे नियोजन केले असून, महिला तक्रारदारांनी या संधीचा लाभ घेऊन आपल्या समस्या मांडाव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे.
000000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button